प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जागांची मर्यादा आणि इच्छुकांची मोठी संख्या यामुळे जागावाटप करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. वरिष्ठांचा प्रदीर्घ अनुभव आणि राजकीय आडाखे यांनुसारच उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाते. या प्रक्रियेत उमेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते दुखावले जाण्याची शक्यता असते. अशाच नाराज कार्यकर्त्यांची जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेतली.
अटीतटीचा संघर्ष आणि कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेत भाजपला बहुमत मिळवून देणे, हेच सध्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे ध्येय असायला हवे, हा चंद्रकांतदादांचा विचार सर्वांना पटला. परिणामी, सर्व नाराजांनी आपले मतभेद बाजूला ठेवून प्रचारात पुन्हा सक्रिय सहभाग घेतला आणि मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्धार केला.
रस्त्यावर उतरून पक्षासाठी संघर्ष करणारा सामान्य कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने नाराज न होता, 'पक्षाची लढाई ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक लढाई आहे' असे समजून एकदिलाने आणि एकसंघ होऊन काम करावे, या विचारावर चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा हा झंझावात आता सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत भाजपची सत्ता बहुमताने आणण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
पक्षसंघटना मजबूत करणे आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना बळ देणे, यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखे नेतृत्व अखंडपणे कार्यरत आहे. इतर पक्षांप्रमाणे केवळ उमेदवारीसाठी अडून बसणारे कार्यकर्ते भाजपमध्ये नाहीत, कारण भाजपची ओळख 'पार्टी विथ डिफरन्स' अशीच आहे, हे दादांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिले. आता एकही कार्यकर्ता नाराज किंवा दुखावलेला नसल्यामुळे आणि संपूर्ण भाजप एकदिलाने रस्त्यावर उतरल्यामुळे, मनपात भाजपला बहुमतापासून कोणीही रोखू शकत नाही, हाच निर्धार आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यांत दिसत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या