प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) : सांगली येथील गुरुद्वार शीख संत समाज येथे प्रभाग क्रमांक १० मधील भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या प्रचार प्रसंगी भाजपा उमेदवार जगन्नाथ दादा ठोकळे, गीताताई पवार, रिद्धी पटेल-महामुलकर तसेच प्रकाश मुळके हे भाजपाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी सांगली येथील गुरुद्वारास भेट दिली.
शिख समाजाच्या वतीने शहराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान दिले जाते. या समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर पूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले. त्यांनी आज सांगली येथील गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते.
गुरुद्वारा येथे आगमन झाल्यानंतर शिख समाजाच्या वतीने यांचा पारंपरिक 'सरोपा' देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी गुरुद्वारात माथा टेकवून दर्शन घेतले आणि लंगर प्रसादाचा लाभ घेतला.
या भेटीदरम्यान शिख समाजाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर चर्चा झाली: गुरुद्वारा परिसराचा विकास भाविकांच्या सोयीसाठी गुरुद्वारा परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे. सुरक्षा आणि स्वच्छता: परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करणे. सांस्कृतिक भवन: समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी हक्काच्या जागेचा किंवा हॉलचा प्रश्न मार्गी लावणे. सांगली येथील शिख समाजाच्या वतीने सामाजिक कार्यासाठी आणि समाजाच्या विस्तारासाठी करण्यात आलेली जागेची मागणी तातडीने मान्य करू असे आश्वासन. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले . यावेळी शिख समाजाच्या शिष्टमंडळाने भाजपा पक्षास जाहीर पाठिंबा दिला.
"शिख समाज हा कष्टाळू आणि सेवाभावी समाज आहे. गुरुद्वारामार्फत राबवले जाणारे सेवाकार्य (लंगर) हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी मी कटिबद्ध असून, त्यांनी केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून घेतल्या जातील," असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे समस्त सिख समाज सांगली जिल्हा अध्यक्ष - सविंद्रसिंग चढ्ढा, उपाध्यक्ष हरप्रीतसिंग खगुरा, सेक्रेटरी हरप्रीत सिंग बाजबा, दातारसिंग जुनेजा, भुपेंद्रसिंग मंदिरता, अमरजीत सिंग मेदिरला, बिटूसिंग कयरिया, मनजितसिंग भाटीया, हैप्पी सिंग, जसविद सिंग सैनी, महोन सिंगजी अमरजीता खगुरा, तसेच किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैय्या पवार, मकरंद महामूलकर, सुरजमामा पवार आशुतोष कलगुटगी, शेरसिंग धिल्लो प्रफुल ठोकळे भाजपा पदाधिकारी, शिख समाजातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या