प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १९ मधील संजय भोकरे परिसरात भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या पदयात्रेद्वारे परिसरातील महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेण्यात आल्या. यावेळी महिला मोर्चा पदाधिकारी ईशा साठ्ये सामाजिक कार्यकर्ते विकास ऐवळे, महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या तसेच अनेक स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पदयात्रेदरम्यान महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून, महिलांच्या हक्क, सुरक्षा व विकासाबाबत जनजागृती करण्यात आली. स्वातीताई खाडे यांनी महिलांना संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या