प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : भाजपा हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सांगली महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मधून सामान्य कुटुंबातील मसाला दुध विक्रेते प्रदीप बन्ने व सामान्य गृहिणी विद्या दानोळे यांना उमेदवारी देऊन भाजपाने आपण जनसामान्यांचा पक्ष असल्याचा ठोस संदेश दिला आहे.
या अनुषंगाने भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी उमेदवार बन्ने व दानोळे यांची भेट घेतली. यावेळी पक्षबांधणी, निवडणूक प्रचार व मतदान वाढविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभागात प्रभावी प्रचार करण्यासाठी आवश्यक व्यूहरचना व नियोजन ठरविण्यात आले.
सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याच्या भाजपाच्या भूमिकेमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकीत जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या