प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : भाजपच्या निर्णायक विजयासाठी केंद्र व राज्यस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असतानाच सांगली जिल्ह्यात एक नाव ठळकपणे चर्चेत आले आहे. ते म्हणजे भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे.
माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ त्यांना लाभत असले, तरी स्वतःच्या कार्यपद्धतीने व संघटन कौशल्याने त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पदाच्या जबाबदारीला पूर्ण न्याय देत त्यांनी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अक्षरशः पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
विविध सामाजिक संस्था, प्रार्थनास्थळे, ज्येष्ठ नागरिक, संघटना तसेच पदाधिकारी यांच्याशी त्या सातत्याने संवाद साधत आहेत. भाजपची धोरणे, विकासाचा अजेंडा आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी प्रचार सुरू असून संघटनात्मक बांधणीला त्यांनी वेग दिला आहे.
विशेष म्हणजे, प्रचार करताना वरिष्ठांकडून आलेल्या सर्व सूचना, नियम व शिस्त यांचे काटेकोर पालन करत त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकसंध, शिस्तबद्ध आणि उद्दिष्टाभिमुख वाटचालीतून पुढे नेत आहेत.
याच कार्यशैलीमुळे आज पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये स्वातीताई खाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, भाजपच्या विजयासाठी त्या एक प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना वरिष्ठांचे तसेच कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या