प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एमसीए अंडर–१९ इन्व्हिटेशन लीग स्पर्धेत
सांगली जिल्हा क्रिकेट संघाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला आहे.
ही उपांत्य फेरीतील महत्त्वपूर्ण लढत येत्या सोमवारपासून ‘सेक्रेटरी इलेव्हन’ संघासोबत खेळविण्यात येणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन माननीय संजयजी बजाज,
खजिनदार— सी. के. पवार, किशोरभाई शहा,
महाराष्ट्र राज्य टूर्नामेंट कमिटीचे सदस्य — निलेश शहा,
निवड समिती सदस्य — चेतन पडियार, सागर कोरे, प्रशांत कोरे,
संघ प्रशिक्षक — सागर कोरे व कपिल गस्ते,तसेच युसूफ जमादार, सुमित चव्हाण आणि अमित फारणे
यांनी संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या शानदार कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या