प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : शालेय विभागीय स्तरीय आष्टूडू आखाडा स्पर्धा दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे पार पडल्या. या स्पर्धेत खाडे इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. तक्षा पवार हिने उत्कृष्ट कामगिरी करत भाला संतुलन या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या यशासह तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तक्षाच्या या घवघवीत यशाबद्दल खाडे इंग्लिश स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापक संगीता पाटील तसेच क्रीडा शिक्षक स्टीफन काकी यांनी तिचे अभिनंदन केले असून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तक्षाला हे यश मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या