प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भाजप किसान मोर्चाचें महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी वेळोवेळी पक्ष विरोधी भूमिका घेतली असल्याचा ठपका ठेवून जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी आज त्यांचे निलंबन केल्याचे सांगितले.याबाबत संदीप गिड्डे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले कि,सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणूक सुरू आहेत.माझे मित्र व पक्षाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे मानखुर्द शिवाजीनगर या प्रभागातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत,माझ्या कवठेमंकाळ तालुक्यातील अनेक मतदार या प्रभागांमध्ये आहेत.त्यामुळे पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार मी सध्या नवनाथ बन यांच्या प्रचारामध्ये आहे. जिल्हाध्यक्षांनी निर्गमित केलेल्या पत्राबाबत मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो असता त्यांनी आपण पक्षाच्या कामात व प्रचारात रहा असा आदेश दिला असून जिल्हाध्यक्षांच्या पत्रा बाबत १५ तारखेनंतर भूमिका घेऊ असे स्पष्टीकरण दिले आहे.तासगाव नगरपालिकेत घेतलेली भूमिका ही माझी जाहीर भूमिका होती.मी आजही त्याच भूमिकेबरोबर ठाम आहे.तासगाव नगरपालिकेमध्ये नेमकं काय काय झाले याबाबत सविस्तर अहवाल मी या अगोदरच प्रदेशाध्यक्षांना दिला आहे.जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी घेतलेली भूमिका मला त्यांची वैयक्तिक वाटत नसून या भूमिकेत जिल्ह्यातील एक दोन नेत्यांचा विशेष रस असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माझी सध्या कोणावरही नाराजी नाही.पण झारीतील शुक्राचार्य मी संपविल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा संदीप गिड्डे पाटील यांनी प्रसार माध्यमा द्वारे दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या