प्रतिष्ठा न्यूज
कडेगांव प्रतिनिधी : कोल्हापूरच्या मानवतावादी संस्कृती चळवळ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार तडसर ( ता कडेगांव) येथील जेष्ठ व मुक्त पत्रकार साहित्यिक सदानंद माळी यांना जाहीर करण्यात आला आहे याबाबतच्या निवडीचे पत्र मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिले आहे सदानंद माळी हे गेली ३७वर्ष पञकारीता क्षेञात कार्यरत आहेत. त्यांनी दै दक्षिण महाराष्ट्र केसरी, दै नगर केसरी, दै जनप्रवास, दै लोकमत, दै पुण्यनगरी, दै बंधुता मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून पञकारीता केली आहे . पञकारीतेत त्यांनी शैक्षणिक उठावावर मालीका लिहून शैक्षणिक क्षेञातील समस्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर साहित्यिक क्षेञातही कार्यरत आहेत विविध संमेलनातील काव्य संमेलनात कवी संमेलनात अध्यक्ष पद भूषविले आहे. अनेक विद्यालयात व महाविद्यालयात त्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचाल तर वाचाल यावरती व्याख्याने दिली आहेत. अशा सर्व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेवून त्यांना मानवतावादी संस्थेने मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६चा जाहीर केला आहे. हा पुरस्कार सोहळा
लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत, ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डींग हॉलच्या सभागृहात दोन हजारहून अधिक साहित्यिक, विचारवंत आणि कलावंतांच्या उपस्थितीत २५ जानेवारी२६ला होणार्या मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, भारतीय संविधानाचे अभ्यासक, ॲड. जयंत जायभावे, ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते ॲड. डॉ. रमेश विवेकी, सुप्रसिद्ध मानवतावादी शाहीर मा. शाहीर शीतल साठे, मा. शाहीर सचिन माळी, साहित्यिक आणि विचारवंत डॉ. राजेखान शानेदिवाण, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विवेक घाटगे, मा. स्मिताताई पानसरे, अॅड. सुनिता निकम-पांचाळ, मा. अनिल म्हमाने आदी मान्यवरांच्या हस्ते होणार असून मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माळी चे कडेगांव तालुक्यातील विविध संस्थाच्या वतीने तर कडेगांव तालुका पञकार संघ, कडेगांव व खानापूर साहित्यप्रेमी हितचिंतक यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या