प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील नुकतीच नियुक्ती झालेले कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी यांनी कृषी संशोधन केंद्र येथे भेट दिली. संशोधन केंद्राचे पिकांचे असणारे प्रयोग त्याचप्रमाणे सोयाबीन भुईमूग हळद या पिकावरील संशोधनाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे चालू असलेले काम समजून घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी कुलगुरूंचा सत्कार केला. याप्रसंगी विलासराव देशमुख माजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन कसबे डिग्रज श्री विठ्ठल चव्हाण जिल्हाध्यक्ष कृषी परिषद , डॉ.सुनील कराड सहयोगी संशोधन संचालक, केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड डॉ. संग्राम काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या