प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. २१ : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जडणघडणीत लक्षवेधी कामगिरी राहिलेले माजी खासदार सहकार तीर्थ गुलाबराव पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त बँकेच्या मुख्य शाखा आवारातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ,जेष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, नगरसेविका प्राजक्ता धोतरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि बँकेचे अधिकारी,कर्मचारी यांनी गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना तसेच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या गौरवशाली कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
सांगली बाजार समितीमध्ये बाळासाहेब गुरव व लाले वकील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हुल्याळकर मामा व प्राचार्य बी. ए. पाटील आणि सेवक उपस्थित होते.
स्व. गुलाबराव यांनी शेती आणि सहकार अशा राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सर्वांगिण उत्कर्षाचे ध्येय ठेवत महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. त्यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देऊन इथे सहकार रूजवला, त्या माध्यमातून विकासाचे लोण शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रात आणले. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांची शिकवण आणि विचारांचे अनुकरण हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी सकाळी पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते गुलाबरावांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या अभिवादनावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे , इलाही बारूदवाले, पैगंबर शेख, अजय लोखंडे, समीर मुजावर, मौला वंटमोरे, सागर मुळे, रघुनाथ नार्वेकर, अनिल मोहिते, अजय धोतरे, हरून पठाण, अनिल नांगरे, बँकेचे अधिकारी एस एम काटे, शिवाजीराव पाटील, सतीश सावंत, अशोक माने, पी वाय सूर्यवंशी, भास्कर निकम, सौ. पी. ए. पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या