प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक २०, २१ व २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन सांगली जिल्हा क्रेडाई संघटनेचे सचिव दिलीप पाटील यांच्या शुभहस्ते मैदानाचे पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. शार्दुल ठाकूर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य नारायण आपटे व डॉ. आशिष पुराणिक, डॉ. महेंद्र बागुल, डॉ. विजय साळुंखे, प्रा. स्वप्ना उदगावकर, चैतन्य कुलकर्णी तसेच जिमखाना कमिटी सदस्य प्रा. अनिल खर्चे व प्रा. प्रवीण पारधी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात खेळाचे महत्त्व, व्यायामाचे फायदे सांगत महाविद्यालयीन जीवनात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांनीही सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत, खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने स्पर्धेचा लाभ घ्यावा व महाविद्यालयाचे नाव लौकिक करण्यासाठी पुढेही असेच प्रयत्न सुरू ठेवावेत, असे आवाहन केले. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात घेण्यात आल्या असून महाविद्यालयातील सुमारे ३४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्तात्रय मुळूक यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या