प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. २२ : माजी खासदार, सहकार तीर्थ स्व. गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिलादेवी पाटील यांच्या निधनानंतर कर्नाटक व महाराष्ट्रातील माजी मंत्री, अनेक जेष्ठ नेते व लोकप्रतिनिधींनी सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटी देऊन सहवेदना व्यक्त केल्या. राज्याचे पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई सहवेदना व्यक्त करताना म्हणाले, '
बेनाडी हे माझे आजोळ आणि प्रमिलादेवी पाटील या माझ्या आज्जी होत. आज्जींचे माहेर कोल्हापूरच्या निंबाळकर सरदार घराण्यातील आणि क्षात्रजग्दगुरु बेनाडीकर पाटील सासरचे घराणे.. या दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा जपणाऱ्या आमच्या प्रमिलादेवी आज्जींनी सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक कार्यात पाटील कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्या.. आम्हा नातवंडांवर त्यांची अगाध माया होती. त्यांच्या निधनाने आम्ही वात्सल्यसिंधू आज्जीला पारखे झालो. आम्ही पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
सांगली येथील वसंत काॅलनी मधील पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी भेटून पृथ्वीराजबाबा आणि कुटुंबियाचे सांत्वन करत आहेत. त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील,डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजीराव नाईक, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील व श्रीमंत पाटील, आमदार अरुण लाड, आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, आ. जयंत आसगावकर, जेष्ठ नेते मा. आ. मोहनशेठ कदम, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, माजी झेपी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे,लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव पाटील, मोहन वनखंडे इ. नी पृथ्वीराज पाटील यांना भेटून सांत्वन करुन सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी ऋतुराज पाटील, विरेंद्रसिंह पाटील व पाटील कुटुंबिय उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या