प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सोलापूर शाखा – तासगांव यांच्या वतीने आज मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाखाधिकारी यांनी प्रस्तावना सादर करून लोकमंगल समूहाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.यावेळी विशेषतः महिला सन्मान आवर्ती ठेव तसेच सुकन्या ठेव योजना यांची माहिती देत महिलांना बचत व आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेच्या सल्लागार,खातेदार व सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या सर्वसाधारण व्यवस्थापक देवडकर मॅडम,शाखेच्या सल्लागार कल्पना माळी,शाखाधिकारी शुभांगी तोडकर, तसेच क्लार्क गायत्री सूर्यवंशी,सुवर्णा रोमन,सविता कोळी,देवयानी कुंभार यांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेतील कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. महिलांसाठी सणासुदीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक सलोखा व महिलांचा सन्मान जपणारा ठरला, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या