प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन कै.रावबहाद्दूर सदाशिव बाबाजी शेटे यांची १३० वी जयंती बुधवारी बँकेच्या सभागृहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी सभागृहातील कै.रावबहाद्दूर सदाशिव बाबाजी शेटे यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास बँकेचे चेअरमन कुमार शेटे,व्हा.चेअरमन अनिल कुत्ते,संचालक महेश्वर हिंगमिरे,सदाशिव शेटे,अरुण पाटील, विनय शेटे,उदय वाटकर,धोंडीराम सावंत,रामशेठ शेटे,राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे,उदय डफळापूरकर (सीए),अॅड.आशिष अडगळे, संचालिका श्रीमती सविता पैलवान, सौ.उमा हिंगमिरे,मॅनेजमेंट समिती सदस्य अवधूत गडकर,रविंद्र देवधर, प्रदीप पवार,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी तसेच इतर मान्यवर व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर बँकेच्या वतीने शहरातील महिला वर्गासाठी दुपारी ४ ते ६ या वेळेत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ४०० पेक्षा जास्त महिलांनी आपली उपस्थिती नोंदविली.या हळदी-कुंकू कार्यक्रमास तासगांव नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ.विजया पाटील तसेच सर्व महिला नगरसेविका व इतर मान्यवर महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. बँकेच्या संचालिका श्रीमती सविता पैलवान,सौ.उमा हिंगमिरे व बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.यावेळी महिलांशी संवाद साधत बँकेच्या प्रगतीची माहिती व आकडेवारी सादर करण्यात आली.तसेच जास्तीत जास्त महिलांनी बँकेत सेव्हिंग खाती उघडावीत व ठेवी ठेवाव्यात,असे आवाहन करण्यात आले.या उपक्रमामुळे बँक व महिला वर्गातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या