प्रतिष्ठा न्यूज
महाड/ रायगड - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकार्य केल्यानंतर. आज राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शिक्षण विभागाच्या निर्णयावर शिक्षक परिषदेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून शिक्षण विभागाने पदोन्नतीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शिक्षक परीषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सांगली तथा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शशिकांत पाटील यांनी दिली.
मान. सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या 1सप्टेबर 2025 च्या न्यायनिर्णयानुसार पहिली ते आठवीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केलेली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात देशभरातील अनेक राज्यातून राज्य सरकारने व अनेक शिक्षक संघटनांनी मान. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत. अनेक शिक्षक संघटनांनी राज्यस्तरावर , देशपातळीवर आंदोलने केली आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मान. खासदार सो. यानी या प्रश्नासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केलेली आहे. आपण राज्यातील सर्व जिल्हा परिषदेकडून टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात माहिती मागवलेली आहे. सदर माहिती राज्य शासनामार्फत मान. केंद्र सरकारला योग्य तो निर्णय घेण्यासाठी व कार्यवाहीसाठी सादर करावयाची आहे. मान. केंद्र सरकारकडून टीईटी संदर्भात कोणत्या प्रकारचे अधिकृत धोरण जाहीर झालेले नाही.
मात्र राज्यशासनाच्या न्याय व विधी विभागाच्या अनौपचारिक अभिप्रायनुसार पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सेवा जेष्ठता शिक्षकांवर अन्याय होणार आहे.
शासनाच्या सर्व आस्थापनामध्ये सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवली जाते परंतु कोणत्या विभागात लोकसेवा / महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षा घेतली जात नाही असे असताना मात्र शिक्षकांवर अन्याय का असावा? असा प्रश्न शिक्षक वर्गात उपस्थित केला जात आहे.
साधारणपणे 25 ते 30 वर्षांनतर शिक्षकाला पदोन्नती ची संधी मिळते परंतु टीईटीच्या निर्णयामुळे हजारो शिक्षक पदोन्नती पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे शिक्षकावर खूप मोठा अन्याय होणार आहे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेता येणार नाही.
मान. सर्वोच्च न्यायालय व मान. केंद्र सरकार यांचा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल किंवा धोरण प्राप्त होत नाही तोपर्यंत शालेय शिक्षण विभागानी कुठल्याही प्रकारची पदोन्नतीसाठी कार्यवाही करण्यात येऊ नये.
अशी आग्रही मागणी शिक्षक परीषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण सचालकामार्फत राज्य शासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या