प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : राज्यातील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद घटनेबद्दल भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मिरज येथील भाजपा कार्यालयात भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या वतीने दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो, तसेच शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली. यावेळी अनिता हारगे , कपिला पाटील, अनघा कुलकर्णी, बाबासाहेब आळतेकर, मोहन वाटवे, संदीप आवटी, चैतन्य भोकरे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या