प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : आसळज जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचार दौऱ्यामुळे संपूर्ण मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी संभाजी पाटणकर आणि पंचायत समितीसाठी राजेश पाटील यांच्या प्रचारामुळे गावोगावी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
⚫गावागावांत थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवर चर्चा
आसळज मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा पोहोचताच उमेदवारांनी शेतकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामविकास हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अनेक ठिकाणी मतदारांनी आपल्या अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या.
⚫अनुभवाचे नेतृत्व
जिल्हा परिषद उमेदवार संभाजी पाटणकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून, प्रशासकीय अनुभव, संयमी नेतृत्व आणि विकासाभिमुख कामकाजासाठी ओळखले जातात. गगनगिरी महाराजांच्या घराण्याशी त्यांचा संबंध असल्याने सामाजिक व धार्मिक स्तरावरही त्यांना मोठा पाठिंबा लाभत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
⚫कामातून पुढे आलेले युवक नेतृत्व
पंचायत समिती उमेदवार राजेश पाटील हे गेली अनेक वर्षे राष्ट्रीय काँग्रेस संघटनेत सातत्याने कार्यरत असून, कामातून स्वतःची ओळख निर्माण करणारे युवक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणापेक्षा लोकांच्या दैनंदिन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे, ही त्यांची कार्यपद्धती आहे. युवक, महिला व शेतकरी यांच्याशी थेट संवाद साधणे, सामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करणे आणि प्रत्येक गावात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रश्न समजून घेणे, ही त्यांची खासियत मानली जाते. ग्रामीण विकास, रोजगाराभिमुख उपक्रम आणि पंचायत पातळीवरील पारदर्शक कारभार याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट असल्याने नव्या पिढीतील मतदारांचा ओढा राजेश पाटील यांच्याकडे वाढताना दिसत आहे.
⚫दिग्गजांची उपस्थिती, संघटनात्मक ताकद
या प्रचार दौऱ्यात डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडू अप्पा पडवळ, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, खोकुरलेचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पाटील, शेनवडे चे टक्के, हेही प्रचारात सामील होते.
यांच्यासह सहकार, पंचायत राज व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, सरपंच व कार्यकर्ते आळीपाळीने सहभागी होत आहेत. यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधोरेखित होत आहे.
⚫चुरशीच्या लढतीची चिन्हे
प्रचार दौऱ्याला मिळणारा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि मतदारांशी होणारा थेट संवाद पाहता, “आसळज मतदारसंघात यावेळी लढत चुरशीची होणार” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुकीचा निकाल कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या