प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी अँड हिज टाईम्स सर जदुनाथ सरकार यांच्या शिवचरित्राचे पुनर्मुल्यांकन ग्रंथाचे 24 ला प्रकाशन
डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. मिलिंद आवाड यांची उपस्थिती
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सत्यशोधक इतिहास परिषद, श्रावस्ती प्रकाशन, निर्मिती प्रकाशन, प्रकाशित सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस लिखित शिवाजी अँड हिज टाईम्स सर जदुनाथ सरकार यांच्या शिवचरित्राचे पुनर्मुल्यांकन या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार. 24 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 1:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या प्रकाशन समारंभास जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्लीचे डॉ. मिलिंद आवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी, लेखक व दिग्दर्शक अनिल म्हमाने असून सदर प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक डॉ. मिनल राजहंस आणि ॲड. डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.
संपर्क : 9822472109
----------------------
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या