प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जन्मशताब्दी शिवसेना तासगाव शहर व तालुका यांच्या वतीने आज अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित शिवसैनिक व नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा गौरव करण्यात आला.यावेळी पुरण मलमे,प्रमोद सावंत,दत्ता थोरात,संजय खरमाटे, दिलीप कोळीगुड्डे,शहाजी बापू जाधव,प्रसाद पाटील,जॉन भाई, किरण थोरात,पप्पू वादवणे,सुनिता ताई थोरात,लक्ष्मी कोळी,कामिनी कोळी तसेच इतर अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात व शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या