गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश पांडुरंग देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कळे इथील विद्या मंदिर व आनंदी इंग्लिश मिडीयम स्कूल, कळंबे येथे प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले. कळंबे येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिराला शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात विद्यार्थींच्या रक्तगटाची तपासणी करून त्यांना व्यक्तिगत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शाळांनी आरोग्याविषयी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच, अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा केला गेला.
कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. विद्या देसाई, प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील, प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. एस. एस. पानारी, डॉ. ए. एस. कांबळे, प्राचार्य डी. बी. भोसले, प्राचार्य अनुपम कामेरीकर, तसेच शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे संभाजी पाटील (अध्यक्ष), राजनंदा देसाई (उपाध्यक्ष), युगंधरा देसाई, पूनम खोत, धनाजी अडीसरे, सागर देसावळे, सरदार कांबळे, रुपाली कांबळे, सरदार पाटील, प्रियांका पाटील, अबोली सुतार, उज्वला पाटील, माधव भारती, अमरदीप पुजारी, मुख्याध्यापक रामचंद्र नाळे यांसह अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
उपस्थितांनी या आरोग्योपयोगी उपक्रमाचे कौतुक केले आणि असा उपक्रम स्थानिक पातळीवरील आरोग्यजागृतीसाठी मौल्यवान असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात दिलेला संदेश असा होता की, "वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत साजरा करणे — हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे."
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या