प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली शहर ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम, सांगली येथे सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडला.
संस्थेचे आश्रयदाते मा. श्री. डोंबाळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि उत्साह व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव श्री. युवराज खटके यांनी केले. यावेळी योगा क्लबचे सभासद, क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, तायक्वांदो, फुटबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, स्केटिंग आदी विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर नियमित सराव करणाऱ्या विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. क्रीडापटूंच्या उपस्थितीमुळे संपूर्ण स्टेडियम परिसरात देशभक्ती, क्रीडाभावना आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव तथा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री. बापू संभाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत आणि देशभक्तीचा संदेश देत कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या