प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली : वानलेसवाडी-कुपवाड येथील शाम भाडेकरी मालकीहक्क गृहनिर्माण सहकारी संस्था लि.च्या युनिट २ येथील खुला भूखंड क्र. ८ येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. दीपक वायदे, सौ. योगिता राठोड, माजी नगरसेवक श्री. राजेंद्र कुंभार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री. बापू समलेवाले, सौ. सायरा समलेवाले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद, नागरिक व परिसरातील मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजास मानवंदना देत ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक व वीर जवानांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे लोकमत कॅम्पस क्लब, सांगली व सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत संस्थेतील कु. अदिती उजर समलेवाले हिने ५० मीटर धावणे, चेंडूफेक यामध्ये तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. ऐश्वर्या वायदे हिने चौथा क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अमित दणाणे, सौ. सीमा दणाणे, सौ. प्रियंका वायदे, सौ. मंगल खरटमल, सौ. अर्चना सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या