प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : विजयपूर जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरू असून, बसवनबागेवाडी तालुक्यातील हूविनहिप्परगी येथे चार मुखवटाधारी चोरांनी दुकानांचे शटर तोडून चोरी केली.
हूविनहिप्परगी येथील रैैत संपर्क केंद्र, खासगी खत दुकान तसेच हार्डवेअर दुकानांना चोरांनी लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांचे शटर तोडून चोरांनी आत प्रवेश केला आणि चोरी केली.
चोरीची संपूर्ण घटना दुकानांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चार मुखवटाधारी चोरांची टोळी चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आली आहे.
या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बसवनबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या