सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस स्वदेशी व्हिला येथे विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, धार्मिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. दिवसभर विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी श्री. रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त आमदार व माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ, , माजी आमदार श्री. नितीन शिंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सावकार मादनाईक , जिल्हा परिषद सदस्य श्री प्रशांत अवधूत आणि मंजिरीताई गाडगीळ यांनी श्री. रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील, चेअरमन श्री. संजय शेटे, श्री. अनिल बागणे , महामंत्री श्री. शशिकांत राजोबा यांच्यासह संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी श्री. रावसाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शांतीसागर पतसंस्थेचे चेअरमन श्री. सुरेश पाटील आणि वीराचार्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. मोहन नवले संचालक श्री अजित भंडे आनंद सागर गौरवाडे व इतर संचालक यांनी श्री. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे संचालक श्री. लालासाहेब थोटे, श्री. वसंतराव नवले, डॉ. रमेश ढबू, श्री. चेतन पाटील, श्री. चंदन केटकाळे, कार्यकारी संचालक श्री. अनिल मगदूम तसेच पतसंस्थेचे विविध विभागीय अधिकारी ,शाखाप्रमुख, व कर्मचारी यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे पश्चिम विभाग प्रमुख श्री. प्रशांत गोंडाजी, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. महावीर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कोल्हापूर जिल्हा जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष श्री. महावीर तकडे भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ. उज्ज्वला चौधरी व महिला पदाधिकारी अन्य पदाधिकाऱ्यांनी श्री. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील जैन प्रकोष्ठच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने भेटी देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या वतीने गणेशनगर येथे सकाळी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक डॉ. डी. डी. चौगुले आणि बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य तांबोळी सर यांच्यासह विविध शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
केमिस्ट संघटनेचे श्री. अजित सकळे, श्री. सचिन सकळे, श्री. अविनाश पोरे, श्री. विवेक लडगे, श्री. महावीर खोत, श्री. विकास चौगुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी श्री. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
जिव्हाळा ग्रुपचे सर्व सदस्य, हॉटेल मालक-चालक संघटनेचे श्री. शैलेश पवार, उद्योजक श्री. सागर वडगावे, माजी महापौर श्री. प्रशांत उर्फ पप्पू मजलेकर, एडवोकेट अमोल चिमाण्णा ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री संदीप राजोबा , बिल्डर श्री. राजेंद्र पोळ, श्री. सचिन संकपाळ, श्री. शितल पाटील, माजी नगरसेवक सांगली जैन बोर्डिंगचे श्री. मदन पाटील, श्री. राहुल चौगुले ॲड. जयंत नवले तसेच सरकारी वकील ॲड. चिपरे तसेच विविध व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही श्री. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, पत्रकार, गणेशनगर परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनीही श्री. रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रत्यक्ष भेटीसोबतच फोन, व्हॉट्सॲप, दूरध्वनी तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांतूनही श्री. रावसाहेब पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मित्रपरिवार, हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी संदेश, फोन व सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
श्री. रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुपवाड येथीलवृद्ध सेवा आश्रमात अन्नदान करण्यात आले. तसेच सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी ब्रह्मनाळ येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांचा प्रेमळ सहभाग यामुळे श्री. रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या