सांगली दिनांक 29-सांगली डिस्ट्रिक्ट हॅण्डबॉल असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष आणि उपमहापौर गजानन मगदूम यांनी महापौर चषक हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याची ग्वाही दिली.
आज झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यश प्राप्त, खेळाडू, संघटक, पंच यांचा सत्कार करण्यात आला. सन 2026-27 या वर्षात किमान एक राज्य किंवा राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन आणि पंच परीक्षा घेण्यात येईल. या सभेत सन 2025-26 च्या वार्षिक अहवाल, जमा खर्चास मंजुरी देण्यात आली. संघटनेच्या नियमावलीचा भंग करणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वागत -प्रास्ताविक सेक्रेटरी प्रा. जहांगीर तांबोळी यांनी केले. संघटनेचे खजिनदार प्रा. हर्षकुमार पाचोरे यांनी 2026-27 साठीचे अंदाजपत्रक मांडले. शेवटी उपाध्यक्ष प्रा. प्रदिपकुमार चव्हाण यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या