प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २९ : हि. हा. राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली येथे शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी महान 🏑हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास *मा.मुख्याध्यापक, केदारी रसाळ , उपमुख्याध्यापिका सौ. विनोदिनी मिरजकर , पर्यवेक्षिका श्रीमती वैजयंती सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक श्री एकनाथ कौटे, श्री मधुकर वायळ, श्री प्रमोद भोये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. मा. प्रमुख वक्ते सुळे सर* यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची माहिती दिली. त्यांच्या जीवनातून शिस्त, सातत्य, मेहनत, संघभावना आणि खिलाडूवृत्ती यांचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रम व खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडाकौशल्य दाखविले. खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम व क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व सांगितले. “खेळा, निरोगी राहा आणि खिलाडूवृत्ती जपा” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
प्रशालेतील शिक्षकवृंद, क्रीडा विभाग आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिन आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या