सांगली प्रतिनिधी ; जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलने मला सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्यामुळेच मी खेळात सहभागी होऊ शकले. राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून शाळेचे नाव मोठे करता आले, याचा मनस्वी आनंद आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानात उतरून खेळाची आवड जोपासली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय खेळाडू नंदिनी पांढरे हिने केले
श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलमध्ये आयोजित राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ती बोलत होती. यावेळी मुख्याध्यापिका सौ संध्या गोंधळेकर क्रिडा शिक्षिका रुकसाना मुलाणी, रमेश अहिरे उपस्थित होते.
राष्ट्रीय खेळाडू नंदीनी पांढरे हिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अपयशाची भीती न बाळगता नियमित सराव, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन मुख्याध्यापिका सौ संध्या गोंधळेकर यांनी केले.
रुकसाना मुलाणी यांनी प्रास्ताविकात मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती सांगितली. रमेश अहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या