मिरज, दि. २९ ऑगस्ट : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संचलित संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरज येथे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मनपाचे समन्वयक संदीप सातपुते उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीकमसलत, विद्या घुगरे उपस्थित होते.
संदीप सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “बौद्धिक खेळांइतकेच मैदानी खेळही महत्त्वाचे असून, मोबाईलपेक्षा विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे,” असे आवाहन केले. खेळांमुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जिद्द विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी व बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, कार्यकारी विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील व संकुल समन्वयक डॉ. सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन क्रीडा शिक्षक दीपक शेलार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या