प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : अथक परिश्रम, महत्त्वाकांक्षा आणि ध्येयनिश्चिती या मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आजच्या आधुनिक युगात युवकांसाठी विविध क्षेत्रांत व्यवसाय आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी ध्येय, चिकाटी आणि कठोर मेहनतीचा अवलंब करून स्वतःला आत्मसंपन्न बनवावे, प्रतिपादन पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले.महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागातर्फे आयोजित 'करिअर व व्यवसायाच्या संधी' या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, संधी शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्नवादी बनणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. ए. एस. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. हुसेन फरास यांनी केले, तर सूत्रसंचालन ऐश्वर्या धामोडकर यांनी कौशल्याने हाताळले. शेवटी प्रा. सौरभ देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश देसाई व संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. या प्रसंगी उपप्राचार्य संदीप पानारी, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डी. बी. भोसले, प्रा. रोहित सरनोबत, प्रा. अरुण गावकर आणि प्रा. मानसी मोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या