आरवडे : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव यांच्या अंतरवासिता टप्पा क्रमांक २ अंतर्गत श्री सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणास्रोत अभिवादन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर भित्तिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री सिद्धनाथ हायस्कूलचे ग्रंथपाल श्री. एस. बी. गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालयाचे महत्त्व समजावे तसेच वाचनसंस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत आरवडे गावातून ग्रंथदिंडी काढली. ग्रंथदिंडीमुळे गावात वाचनसंस्कृतीचा संदेश पोहोचला.
कार्यक्रमाची प्रस्तावना कु. मोनिका जाधव यांनी केली. यावेळी कु. स्वराजली तांदळे व श्री. एस. बी. इंगळे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी श्री. एम. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले. कु. अस्मिता ढबडे यांनी ऋणनिर्देश केला.
गटप्रमुख प्राध्यापक पी. एस. शेंडगे, आंतरवासिता प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए. एस चिखलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन ग्रंथालयाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या