आरवडे : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या शालेय आंतरवासिता उपक्रमांतर्गत संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी श्री सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणास्रोतांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर संत सावता माळी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले.
पुण्यतिथीचे औचित्य साधून समाजशास्त्र मंडळाच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच कार्यक्रमादरम्यान संत सावता माळी महाराज यांच्या विचारांचा, शिकवणीचा आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री. एम. बी. पाटील, पर्यवेक्षक श्री. पी. डी. चव्हाण, शिक्षक-शिक्षिका तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना अभिरूप शिक्षिका कु. आरती कोरे यांनी केली. सूत्रसंचालन अभिरूप शिक्षिका कु. मानसी दहिवडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. कविता जाधव यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या