प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राहक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मिलिंद सुतार यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड केली.या निवडीबद्दल तसेच सुतार यांच्या आजवरच्या सामाजिक आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्या., तासगाव यांच्या वतीने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित सभेत मिलिंद सुतार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.ग्राहकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आणि सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारे कार्यकर्ते म्हणून सुतार यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जगदीश कालगांवकर,उपाध्यक्ष सुनिल जोशी यांच्यासह सर्व संचालक, सभासद, ठेवीदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचा समारोप संस्थेचे माजी संचालक व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय डफळापूर यांनी केला.संस्थेचे संचालक अथर्व जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.ग्राहक संरक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर झालेली निवड आणि त्यानंतर मिळालेला हा सन्मान मिलिंद सुतार यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली नवी पावती ठरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या