सांगली प्रतिनिधी : लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी आणि शांतिनिकेतन डे बोर्डिंग सांगली मधील विद्यार्थ्यांचा वक्तृत्व स्पर्धेमध्ये दबदबा कायम आहे.
हिंद विजय मंडळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील सार्वजनिक वाचनालय इनाम धामणी तालुका मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये घवघवीत असे यश संपादन केले आहे.
मोठ्या गटामध्ये इयत्ता आठवी ते दहावी मधील सुमारे 26 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वरती विचार मंथन करताना
श्लोक धनंजय माने इयत्ता नववी इंग्रजी माध्यमचा विद्यार्थी याने प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच अक्षरा विश्वास पाटील या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे उपसंचालक डी. एस. माने, उपमुख्याध्यापक अनिल कुंभार सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुकाचा वर्षाव केला.
सदर विद्यार्थ्यांना शिवराज कारंडे यांनी मार्गदर्शन केले
तसेच नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे संचालक गौतम भाऊ पाटील उपसंचालक तथा स्कूल इन्चार्ज डी. एस. माने, अकॅडमी इन्चार्ज डॉ. समिता पाटील,शांतिनिकेतन विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक अनिल कुंभार यांचे प्रोत्साहन मिळाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या