प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सांगली येथील मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य लेखन, सामाजिक कार्य आणि त्यांच्या विविध चळवळी विषयीचे महत्त्व विशद केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. अभिजित कदम (सुप्रसिद्ध लोककलावंत) यांनी मार्गदर्शन करताना अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित घटकांना आवाज दिला, याबद्दलची माहिती विशद केली. तसेच त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व छक्कड यांचं सादरीकरण करून त्यांचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत लेखन आणि वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. व्ही. कुपवाडे अध्यक्ष स्थानी होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. डॉ. पी. एन. गोरे (उपप्राचार्य, कला विभाग) प्रा. डॉ. पी. एन. चौगुले (उपप्राचार्य, पदव्युत्तर विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश नायकुडे यांनी केले, तर प्रा. सागर गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या