प्रतिष्ठा न्युज/ अक्षय कोठावळे
मजले, दि. १ ऑगस्ट : लोकशाहीर, साहित्यसम्राट आणि समाजप्रबोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मजले (ता. हातकणंगले) येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती संतोष कोंडीबा कांबळे उपस्थित होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुमती नेमिनाथ पाटील, पत्रकार आशिष कोठावळे तसेच ग्रामस्थांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक समता, श्रमिकांच्या हक्कासाठीचा लढा आणि समाजप्रबोधनातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजात समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या