प्रतिष्ठा न्यूज
सांगलीवाडी.. दि. 1 : शेतमजूर , कष्टकरी, झोपडपट्टी, कामगार या सर्व वंचितांची दुःखे आपल्या साहित्य क्षेत्रात आणून त्यांना व्यासपीठ देणारे अण्णाभाऊ हे साहित्यातील युगपुरुष होते केवळ अनुभव आणि सामाजिक निरीक्षण याच्या जोरावर प्रतिभा लाभलेला हा एक सर्वोत्कृष्ट साहित्यिक होता असे उद्गार इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दत्ताभाऊ पवार यांनी सांगलीवाडी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काडले. पुरोगामी तत्त्वज्ञानावर आधारित त्यांची संपूर्ण रचना होती.
संस्थेचे उपाध्यक्ष शहाजी पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी सर्वांचे स्वागत संस्थेचे सचिव शाहीर पाटील यांनी केले. याप्रसंगी दीपक यादव, गोविंद दगडू कोळी, एडवोकेट प्रकाश पाटील, एडवोकेट सुशांम पाटील, सिद्धार्थ चिपरीकर , व्यवस्थापक अरुण अमर पाटील कॉन्ट्रॅक्टर बाबुराव पाटील विजापूरकर सीमा पाटील परिसरातील नागरिक उपस्थित होते , कार्यक्रमाचे संयोजन सीमाताई पाटील संदीप यादव यांनी केले.सर्वांचे आभार महेश आदके यांनी मांनले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या