सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे तसेच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक समतेचा संदेश आणि लोकजागृतीतील योगदानाबरोबरच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकासातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कार्यरत राहण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली महानगरपालिका उपायुक्त अश्विनी पाटील, महिला व बालकल्याण विकास समिती सभापती गीता पवार, सहाय्यक उपआयुक्त माणिक गोंधळे, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, युवक अध्यक्ष राहुल पवार, नगरसेवक अभिजित कोळी, सचिन जगदाळे, सूरज पवार, शेडजी मोहिते, मुस्ताक रंगरेज, ज्योती आदाटे, आयुब बारगीर, चंद्रकांत माने, छाया जाधव, वैशाली धुमाळ, शारदा माळी, प्रणवी पाटील, डॉ. शुभम जाधव, महालिंग हेगडे, विनायक हेगडे, विनायक केरीपाळे, शीतल खाडे, इर्शाद पखाली, कुमार वायदंडे, विपुल केरीपाळे, धनंजय रुपनर, नंदकुमार घाडगे, दत्ता पाटील, अमित चव्हाण, राजू कांबळे, संदीप कांबळे, विश्वास लोंढे, अभिजित रांजणे, आदर्श कांबळे, ऋषिकेश गवळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या