प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांच्या स्मृतिगंध सेवालयाच्या वतीने वृक्षारोपण सोहळा तसेच उपक्रमाच्या नामफलकाचे अनावरण रविवारी उत्साहात पार पडले. नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे संचालक गौतम (भाऊ) पाटील यांच्या उदात्त विचार, प्रेरणा व सहकार्यातून निर्माण झालेल्या स्मृतिगंध सेवालय या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
पंचशील नगर, जुना बुधगाव रोड, समाज कल्याण ऑफिसजवळील शिंदे मळा, सांगली येथे झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमास आभाळमाया फाउंडेशनचे संस्थापक आर्कि. प्रमोद चौगुले, नगरसेवक संजय नारायण यमगर, नगरसेविका रेहाना वसीम शिकलगार, नगरसेविका लक्ष्मी रघुनाथ सरगर तसेच उपयुक्त स्मृती पाटील, प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांच्यासह नागरिक व सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच समाजात मानवतेची भावना रुजविण्याचा आणि एकमेकांना सहकार्याचा हात देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
“चला... माणुसकी जपू या... दूरवर सुगंध पसरू या...” या विचाराने सुरू करण्यात आलेल्या स्मृतिगंध सेवालयाच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या