तासगाव प्रतिनिधी : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या शालेय आंतरवासिता उपक्रमास आरवडे, चिंचणी, मनेराजुरी, खंडोबाचीवाडी, कवठेएकंद व पलूस येथील विविध विद्यालयांमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रत्नाकर म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संबंधित विद्यालयांमध्ये गटवार करण्यात आलेल्या डिजिटल बॅनरचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक विद्यालयास १०० हून अधिक सीड बॉलचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना विविध वृक्षांच्या बियांचे संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले. यानिमित्ताने सीड बँकेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे मूल्य रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
श्री सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे येथे मुख्याध्यापक एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्रा. प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे नियोजन अभिरूप मुख्याध्यापिका शीतल पाटील व सहकारी शिक्षिकांनी केले.
ल. की. हायस्कूल, पलूस येथे प्राचार्य ए. एस. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्रा. अंकुश पंडित यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. अभिरूप मुख्याध्यापिका अश्विनी वरुडे व सहकारी शिक्षिकांनी नियोजन केले.
पद्मभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालय, खंडोबाचीवाडी येथे मुख्याध्यापक मंडले सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्रा. प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. अभिरूप मुख्याध्यापिका रुचिता घोडके व सहकारी शिक्षिकांनी नियोजन केले.
न्यू इंग्लिश स्कूल, कवठेएकंद येथे मुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रत्नाकर म्हस्के व डॉ. देवदत्त खजूरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. अभिरूप मुख्याध्यापिका सारिका पवार व सहकारी शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल, मनेराजुरी येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक जे. आर. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक डॉ. देवदत्त खजूरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. अभिरूप मुख्याध्यापिका अनुराधा पाटील व सहकारी शिक्षिकांनी नियोजन केले.
विठ्ठलराव पागे विद्यामंदिर, चिंचणी येथे मुख्याध्यापक खोत सर यांच्या अध्यक्षतेखाली व आंतरवासिता विभागप्रमुख डॉ. अर्चना चिखलीकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. अभिरूप मुख्याध्यापिका आरती जाधव व सहकारी शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
शालेय आंतरवासिता उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रत्यक्ष शालेय वातावरणाचा अनुभव मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रपुरुषांच्या कार्याची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या