
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार (तासगाव)
दोंडाईचा: "भारतातील आरोग्य सुविधांमुळे लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे.तसेच बालमृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे.त्याचप्रमाणे जन्मदरात घट दिसून येत आहे.भविष्यात भारतात तरुणांची संख्या कमी होऊन ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवा,सामाजिक सुरक्षा आणि निवृत्तीवेतन यामध्ये गुणवत्तेची गरज आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्येची गुणवत्ता आणि क्षमतेचा राष्ट्र विकासासाठी वापर करणे आवश्यक आहे." असे प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी सांगितले.
ते लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्बोधन करत होते. स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे,श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. कॉलेजमध्ये भूगोल व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी प्रा.आर.पी.पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनानंतर सपना जाधव व ओरसिंग वसावे यांनी लोकसंख्या वाढीविषयी समयोचित मनोगते सादर केली.
त्यानंतर प्रा.एस.एम.ठाकरे यांनी लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केला.
प्राचार्य डॉ.एम.एस.उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले. प्रा.पी.डी. बोरसे, प्रा.एस.एम.ठाकरे व प्रा.आर.पी. पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
चेतना दातेराव यांनी सूत्रसंचालन तर सौरभ कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अमृता चव्हाण, प्रा. योगिता चौधरी, प्रा.पी.एल.खाचणे, प्रा.बी.टी.शेजाळ,प्रा.मंजुषा बावणे,प्रा.रेवती बागुल, प्रा. निशा ठाकूर यांनी प्रयत्न केले.तर शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल,शंकर गिरासे,अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले.द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या