प्रहार जनशक्ती पक्ष व शिवसेना (शिंदे गट) दिव्यांग जनसंपर्कच्या वतीने सावळज येथे व्हीलचेअर सायकलींचे वाटप
By -
जुलै १३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : (ता. तासगाव) येथील प्रहार जनशक्ती व शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू जेष्ठ नागरिकांना प्रहार जनशक्ती व शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने व्हीलचेअर सायकलचे वाटप करण्यात आले.
सावळज येथील प्रहार जनशक्ती पक्ष व शिवसेना शिंदे गट यांचे वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित अध्यक्ष राहुल कलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना या व्हील चेअर सायकलींचे वाटप करण्यात आले.
प्रहार जनशक्ती सावळजच्या या सातत्यपूर्ण उपक्रमात सहा गरजूंना या व्हील चेअर सायकलींचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रहार जनशक्तीचे राहुल कलाल, सदाशिव कांबळे, दिलिप अनुसे, हेमंत भिसे, बाबासो मंडले, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या