सांगली, दि. 16 : जायंट्स ग्रुप ऑफ सांगलीतर्फे सांगली राजवाडा कारागृहात कैदी लोकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री. सुरेश खांडेकर, स्पेशल ऑफिसर फेड 2 क कोल्हापूर यांनी ‘माईंडफुलनेस – एक आंतरिक बदल’ या विषयावर कैद्यांना जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल व प्रेरणादायी विचारांनी कैद्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला.
या उपक्रमाला कारागृह अधीक्षक श्री. विजय कांबळे व संपूर्ण कारागृह प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सेंट्रल कमिटी मेंबर ॲड. विलासराव पवार, युनिट ऑफिसर गुंडूराव वसवाडे, दिगंबर टिकारे, ग्रुपचे अध्यक्ष नितेश पवार, कार्यवाह ॲड. संदीप कोळी उपस्थित होते.
या मार्गदर्शनातून कैद्यांच्या जीवनात नवा दृष्टिकोन निर्माण होईल, त्यांच्या पुढील आयुष्यात सकारात्मक बदल घडेल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. समाजातील पुनर्वसनाच्या प्रक्रियेत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या