सांगली. दि. 14 : मराठा समाज सांगली संस्थेस श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले (ताईसाहेब महाराज), सातारा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, शाल व बुके देऊन संस्थेचे उपाध्यक्ष मा दत्तात्रय सावंत, सरचिटणीस मा. जयवंत सावंत, माजी अध्यक्ष रघुनाथराव पाटील, माजी अध्यक्ष अँड उत्तमराव निकम, माजी अध्यक्ष अभिजीत पाटील कार्यकारिणी सदस्य मा. भाऊसाहेब भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी माजी अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संस्थेमध्ये घेत असलेले वेगवेगळे उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली. तसेच संस्थेच्या इतिहासाचा लेखाजोखा विषद करतांना शाहू महाराजांनी सर्व समाजातील लोकांच्या उन्नतीसाठी ज्या प्रकारे काम केले त्यांच्या विचाराचा वारसा जतन करत मराठा समाज, सांगली ही संस्था काम करीत असल्याचे नमूद केले. संस्थेमध्ये वधू वर सूचक केंद्र, संगणक प्रशिक्षण सेंटर व मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्र सुरू असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील सर्व घटकातील अनेक मान्यवर लोक उपस्थित होते.
मराठा समाज सांगली संस्थेस श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले (ताईसाहेब महाराज), सातारा यांनी सदिच्छा भेट
By -
जुलै १५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या