सांगली प्रतिनिधी : येथील शांतिनिकेतन डे बोर्डिंग स्कूल मधील इयत्ता नववी (इंग्रजी माध्यम) मधील वरुण विनोद जाधव व राजनंदिनी युवराज चव्हाण या विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे होणाऱ्या टी.एस.सी. सेकंड (रायफल शूटिंग विभागातून ) NCC च्या दहा दिवसीय कॅम्पसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
पूर्वीच्या दोन एनसीसी कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर या दोन्ही विद्यार्थ्यांनी पुढील कॅम्पमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, दोघेही रायफल शूटिंग या खेळातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जातात.
या यशामागे प्रशिक्षक रूपविकास घाग आणि जीवन कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संचालक गौतमभाऊ पाटील,स्कूल इन्चार्ज श्री. डी. एस. माने यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अकॅडमी इन्चार्ज सौ. डॉ. समिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर आभार अनिकेत शिंदे यांनी मानले यावेळी पालक, शिक्षक,विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या