सांगली, प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ सांगली तर्फे मूकबधिर मुलांची शाळा, सांगली येथे सन 2025-26 मध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सत्कार सोहळ्यास जायंट्स ग्रुप ऑफ सांगलीचे अध्यक्ष मा. श्री. नितेश विलासराव पवार, कार्यवाह ॲड. संदिप कोळी, खजिनदार मा. श्री. मयुरेश गायकवाड, ग्रुपचे सर्व पदाधिकारी, मूकबधिर शाळेचे सचिव मा. श्री. चंद्रकांत जगदाळे, ॲड. विलासराव पवार (संचालक व केंद्रीय समिती सदस्य), मा. श्री. दिगंबर टिकारे (संचालक), शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव घरपणकर सर, सर्व शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकवर्ग व पालकांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.हा उपक्रम मूकबधिर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरला असून समाजातील सर्व घटकांनी अशा उपक्रमांना पाठबळ द्यावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सांगलीत मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार
By -
जुलै ०१, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या