प्रतिष्ठा न्यूज | सांगली प्रतिनिधी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, विधान परिषदेचे आमदार इद्रीसभाई नायकवडी, माजी मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, नगरसेवक अशोक मासाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रशासनातील शिस्त, विकासाभिमुख दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांशी असलेली बांधिलकी यांचा उल्लेख केला. त्यांच्या कार्यपद्धतीतून अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून, राज्याच्या विकासासाठी दिलेले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सांगली शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी भाजपचे शेखर इनामदार, उपमहापौर गजानन मगदूम, सभापती अतुल माने, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, हर्षवर्धन पाटील, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हणमंत पवार, शेखर माने, स्नेहल सावंत, साक्षी बोरगावे, उत्कर्ष खाडे, योगेंद्र थोरात, करण जामदार, सागर खंडागळे, मनोज सरगर, राधिका हारगे, शरद साळुंखे, दादासाहेब कोळेकर, विकास जाधव, विष्णू माने, अमित जाधव, नितीन चव्हाण, संजय कदम, आकाश माने, तोहीद फकीर, तोहीद शेख, गणेश पाटील, ज्ञानेश पाटील, प्रणव जगदाळे, सुनिता काळे, सोमेश्वरी हुंदरे, सतीश साखळकर, वीरेंद्र थोरात, अक्षय मासाळे, मितेश मोरे, रजाक नाईक, शीतल सोनवणे, बजरंग भाऊ पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या