सांगली, प्रतिनिधी : सांगली शिक्षण संस्थेचे हि. हा. रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली येथे सन १९७५ च्या एस.एस.सी. (११ वी व १० वी) माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेची भेट देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शाळेच्या परिसरावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा भेट स्वरूपात प्रदान केली. या उपक्रमामुळे शाळेतील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांना सुरक्षित व शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांनी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे व शाळेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या