सांगली प्रतिनिधी : सातारा येथील प्रतापगड किल्ले विकास प्राधिकरण बैठकीमध्ये प्रतापगडाच्या विकासासंदर्भात विविध विषयावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये किल्ले प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या सदस्यांसह मिटींग झाली.
यावेळी प्रतापगड किल्ले विकास प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, यापूर्वी विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये अफजल खान वधाची शिल्प तयार असून ते लवकरात लवकर बसवा अशी मागणी आम्ही केली होती. तरी ते शिल्प अद्याप प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवलेले नाही. तरी हे शिल्प बसवण्यास एवढी दिरंगाई का? शिल्प बसवण्यास कोणत्या अडचणीत आहे.
तसेच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास भिंती चित्र स्वरूपात तयार करण्याचा निर्णय सदर मीटिंगमध्ये घेण्यात आला आहे.
तसेच वीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा करण्याचा निर्णय मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष व प्रतापगड किल्ले विकास प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे यांनी व सदस्यांनी केला.
या बैठकीला खासदार श्रिंमंत छत्रपती उदयनराजे भोसले, पर्यटन विकास मंत्री शंभुराजे देसाई, सातारा जिल्हाअधिकारी संतोष पाटील, मंत्री मकरंद आबा पाटील,मिलिंद एकबोटे, काका धुमाळ, विजय नायडू अमोल जाधव, पंकज चव्हाण, अनिरुद्ध कुंभार, भूषण गुरव, चेतन भोसले,आदी उपस्थित होते...
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या