सांगली प्रतिनिधी : पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्व. एस. के. काका पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय स्तरीय समूहगीत स्पर्धेत लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात अकॅडमी व शांतिनिकेतन डे बोर्डिंग स्कूल यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी
1 )आराध्या बाबण्णा जमादार 5 वी सेमी
2 )अर्पिता सुनील गडदे. 7 वी सेमी
3)आर्यन महेश बामणे 7 वी इंग्लिश
4)तनिषा संतोष कुंभार 8 वी इंग्लिश
5)आदिनाथ राजेश डोरले 8 वी सेमी
6)विराज दत्तात्रय कदम 8 वी सेमी
7)अनुष्का प्रवीणकुमार आवटी 9 वी सेमी
8)जान्हवी अर्जुन पाटील.
9.हर्षवर्धन रघुनाथ माळी 8 वी इंग्लिश
10.अभंग सचिन माळी 8 वी इंग्लिश
11.अनुष्का जीवन जाधव 9 वी सेमी
12.सई शितल कांबळे 9 वी इंग्लिश
13.श्रद्धादेवी रमेश मासाळे 9 वी इंग्लिश
14.दिया अशोक खुपकर 9 वी इंग्लिश
15.चेतना सुनील पवार 9 वी इंग्लिश
16.अन्वी सचिन कुंभार 9 वी इंग्लिश
17.श्रावणी संतोष वाघमोडे 10 वी सेमी
विद्यार्थ्यांनी देशभक्ती, शिस्त आणि सांघिक भावनेचा सुंदर संगम घडवत उपस्थितांची मने जिंकली. या यशामागे मार्गदर्शक श्री अनिकेत शिंदे श्री संतोष पाटील श्री संदीप पाटील मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक डी. एस. माने, अकॅडमीच्या इन्चार्ज समिता पाटील तसेच सर्व मान्यवरांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे अकॅडमीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली असून सर्व स्तरातून विजेत्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या